Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

olympic_games_2_101359

africa_village_271009

good_night_22909

justice_144239

round_table_conference_105589

tod_312219

war_and_peace_115139

ही कार्टून्स मी काढलेली नाहीत, नेट वरून घेतलेली आहेत.

दर्या खवळला …

उंच – उंच लाटा बघायला कुणाला नाही आवडणार ? आज भरतीच्या वेळी नेमका लंच टाइम होता, तरीही आम्ही पटापट जेउन ओफिस पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मरीन ड्राइवला गेलो. स्टिल फोटो एकच आहे पण विडियोत काही उंच लाटा दिसतायत त्या पहा. पण जरा जपून … अंगावर तुषार उडतील … !

DSC00066

माझा मित्र, भाविक ठक्कर ह्याने हे शूट केले आहे …

विडियो अपलोड होऊ शकत नाहीये … :((  जे फोर्मट्स योग्य आहेत, ते सर्व करून झाले,  तरीही होत नाही  …

अगोदर आणि नंतर …

हा मला आलेला, किम्बहुना नेहेमीच येत असलेला एक अनुभव आहे. म्हणजे बघा ना, समजा मी एखाद काही काम करतोय, जस मी सध्या एका  बर्यापैकी मोठ्या प्रोजेक्ट वर काम करतोय. किंवा समजा मी एखाद पेंटिंग करतोय, किंवा एखाद ओरिगामी ट्राय करतोय, तर जो पर्यन्त ते काम चालू आहे तोपर्यंत एक प्रकारे इन्वोल्वड वाटत. पण जस ते काम किंवा प्रोजेक्ट पूर्ण होत, तस एक रिकामपण येत, अगदी उदास वाटत म्हणाना हव तर ! खर तर छान झालय पेंटिंग हे माहीत असत, दिसत असत, तरी अशी उदासी का येते कळत नाही. मग काही दिवस असेच जातात … जो पर्यन्त पुन्हा एखाद नवीन काही सुरु होत नाही तोपर्यंत … तुमच्या बाबतीत सुध्हा अस कधी घडलय का ?

कपाट …

माझ मन म्हणजे आता
अगदी कपाटासारख झालय
जरास दार किलकिल केल तरी
सुख, दुखः आठवणी दणादण
अंगावर कोसळतात …
एकदा वाटत ह्या दोघांच्या
घडया घालाव्या छान
मळलेल्या भावनाना स्वच्छ धुवाव
वाळवाव, इस्त्री करावी
सुखाच एक ठीक आहे हो
मळलेल असल तरी ते सुखच
दुखाच तस नसत ना …
ते छानच दिसाव लागत
शेवटी सुख काय आणि दुखः काय
मनाच्या कपाटात
भरलेल्या वस्तूच की …
आपण फक्त कपाट भरत जायच
दार मात्र फारस उघडायच नाही …

एव्ह्ढ़ करच …

माझ्या हृदयाच्या कोप्र्यात
अशी किती दिवस बसणारेस तू ?
ते एकदा मला सांग …
एक तर माझ हृदय आहे छोट
त्यात तू छोटीशी का होईना
जागा व्यापून बसल्येस
बर काही बोलशील तरी ?
तर ते ही नाही …
नुसतीच आपली
गुढग्यात तोंड खुपसून
अचल, अबोल …
बर अस ही नाही की
माझ्या हृदयाचा दरवाजा
मी सताड उघडा ठेवलावता …
तरीही तू आत आलीस
कशी ते तूच जाणे
आणि आता आलीच आहेस तर
निदान काही बोल तरी
का नाव अबोली आहे ते
सार्थ करून दाखवत्येस ?
ते काही नाही
आता एक तर तू काहीतरी बोल
किंवा ही जागा खाली कर आणि
सरळ माझ्या जीवनात प्रवेश कर
म्हणजे तुला ही ऐसपैस जागा मिळेल
सम्पूर्ण हृदय व्यापून घ्यायला …

line artAfter deathMemories

And above

Forget itमोनास्टरी ... किंवा डोंगरावरील घर म्हणू ह्याला हव तर ...

अभियान …

अभियान ...

झुरळ …

झुरळ ...

Hello world!

Welcome to WordPress.com. This is your first post. Edit or delete it and start blogging!